विविध जात ,धर्म आणि पंथातील कष्टकरी लोकांनी परस्परांच्या देवानघेवाणीतून समृद्ध केलेला आणि जपलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी “सलोखा” हा गट काम करतो.
हर्ष मंदेर लिखित, स्वातीजा मनोरमा अनुवादित आणि प्रमोद मुजुमदार संपादित “कारवा ए मोहब्बत अर्थात प्रेमाची वारी ” या धार्मिक एकोप्यासाठी काढलेल्या यात्रेच्या अहवालाचे सादरीकरण आज मोंताज फिल्म स्टुडिओ ,पुणे येथे पार पडले.
मागे लावलेलं सुंदर बॅनर आमचे मित्र डॉ.मोहन देस यांच्या कल्पनेतून साकारले आहे .